वृत्तपत्र विक्रेत्यांचे कार्य महान: अनिल उंबरकार

0
332

पत्रकार संघाच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा

शेगाव: वृत्तपत्र विक्रेता व पत्रकार बांधवांच्या संघटना वेगवेगळ्या असल्या तरी अडीअडचणी सोडविन्याच्या दृष्टिने एकसंघ राहावे असे मत शेगाव पत्रकार संघाचे संस्थापक तथा बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य अनिल उंबरकर यांनी व्यक्त केले. आळसणा रोड वरील विश्वनाथ नगर 3 येथे शेगाव शहरातील वृत्तपत्र विक्रेता बांधवांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. वृत्त पत्र विक्रेता दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणही करण्यात आले. त्याप्रासंगिक ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एमईसीबी सेवनिवृत्त कर्मचारी रामेश्वरअन्ना सोळंके यांची तर प्रमुख उपस्थिती म्हणून कैलास खंडेराव पाटील होते.याप्रसंगी शेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश उन्हाळे पाटील, तालुकाध्यक्ष संजय स्वामी, मुरलीधर काळे,गोविंद धंदर, राजेश तायडे, नारायण ठोसरे, पी टी पांडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शेगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश महाजन, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर कुकडे, सदस्य राजकुमार व्यास,नारायण दाभाडे, ज्ञानेश्वर ताकोते, नितिन पहुरकर आदींची उपस्थिती होती. संचलन शेगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश महाजन तर आभार शेगाव पत्रकार संघाचे सचिव अमर बोरसे यांनी मानले.

Advertisements
Previous articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा; यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश
Next articleकोविड – १९ काळात निष्पक्ष,पारदर्शक व सुरक्षित निवडणुकांकरिता स्टार प्रचारकांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here