मनसेचे चुना लगाओ आंदोलन; जळगाव ते नांदुरा रस्त्याचे काम निकृष्ट

0
186

मंगेश फरपट |
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
नांदुरा: जळगाव जामोद ते नांदुरा रोडवरील रस्त्याचे काम काही दिवसापूर्वीच पूर्ण झाले असून एकाच पावसाळ्यात या रोडवर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. करोडो रुपये खर्च करून सुद्धा रोडचे काम निष्कृष्ट दर्जाचे होत असेल तर यात अक्षरशः अधिकारी व कंत्राटदार हे जनतेला चुना लावत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी रोडवरील भेगांमध्ये अक्षरशः चुना व बेशरम झाड लावून निषेध व्यक्त केला.
सदर रोडची पुन्हा पाहणी करून तिथेच निवेदन देण्याकरिता कार्यकारी अभियंता साहेब, राष्ट्रीय महामार्ग विभाग, अकोला यांना सूचना देऊन सुद्धा बोलावण्यात आले होते पण अधिकारी हजर न झाल्यामुळे मनसे शाडो मंत्री तथा विदर्भ नेते विठ्ठलराव लोखंडकार, मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन करण्यात आले.
यामध्ये मनसे नांदुरा तालुकाध्यक्ष भागवत उगले, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर, तालुका प्रसिद्धीप्रमुख योगेश अरुण सपकाळ, उपाध्यक्ष राजू काळे, ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ टेंभुर्ने, नांदुरा शहराध्यक्ष सागर नानाराव जगदाळे, उपाध्यक्ष निकेतन वाघमारे, शहर संघटक विशाल बगन, विभाग प्रमुख विठ्ठल निंबाळकर, युवा नेते अजयभाऊ बेलोकार, लक्ष्मण बारगजे, सोपान फाटे, गौरव टेंभुर्ने, गुड्डू राठोड, कार्तिक काजळे, सचिन तायडे आदी सहभागी झाले होते.

Advertisements
Previous articleखोटी ‌माहिती सादर केल्यास‌ गुन्हे दाखल करण्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश
Next articleसमायोजनातून 10 शिक्षकांच्या बदल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here