समायोजनातून 10 शिक्षकांच्या बदल्या

0
112

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: राज्यभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या 10 शिक्षकांच्या बदल्या समायोजनातून करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषदेमध्ये आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत समायोजनाची प्रक्रिया पार पडली. अकोला जिल्हा परिषदेमध्ये 10 शिक्षकांच्या बदल्या काही महिन्यापूर्वीच झाल्या  होत्या. मात्र कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर  सदर शिक्षकांच्या नियुक्त्या  रखडल्या  होत्या. सोमवारी, 19 ऑक्टोबररोजी यासंदर्भात जिल्हा परिषदेमध्ये नियुक्त्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. दहाही शिक्षकांना रिक्त जागांनुसार पदस्थापना देण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी  अधिकारी सौरभ कटियार, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी उपस्थित  होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here