विनापरवानगी कोरोना टेस्टिंग; अकोल्याच्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

0
278

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला :-  केंद्र, राज्य आणि आयसीएमआर यांची परवानगी न घेताच परस्पर ठाणे येथील इन्फेक्स लॅबौरटरिज येथे कोरोना नमुने पाठवून वैद्यकीय अहवाल दिल्याप्रकरणी अकोल्याच्या डॉ. राम मंत्री आणि ठाणे येथील इन्फेक्स लेबॉरटरिजविरोधात सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमानखा प्लॉट भागात डॉ. राम मंत्री लॅब चालवतात. सरकारकडून कोरोना चाचणीची परवानगी नसताना त्यांनी 29 सप्टेंबरपासून खासगी डॉक्टरांना हाताशी धरून अनेकांची कोरोना तपासणी केली. या प्रयोगशाळेतून 159 जणांचे तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह देण्यात आले आहेत. या प्रयोगशाळेमधून अनेकांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या असाव्यात असा अंदाज वैद्यकीय यंत्रणेने व्यक्त केला आहे.

 

Advertisements
Previous articleमध्य रेल्वे चालविणार उत्सव विशेष ट्रेन
Next articleअखेर नमुना ड चा प्रश्न निकाली; जिगाव प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात आ. डॉ. संजय कुटे यांना यश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here