अखेर नमुना ड चा प्रश्न निकाली; जिगाव प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात आ. डॉ. संजय कुटे यांना यश

0
231

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
जळगाव जा. : जिगाव प्रकल्प गेल्या सरकारच्या काळात चांगल्या वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू होता आणि त्याप्रमाणे काम सुद्धा सुरू झाले होते, या करिता सातत्यपूर्ण प्रयत्न आ. डॉ. संजय कुटे आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांनी केले. परंतु सत्तांतराने अधिकारी वर्गाची मानसिकता बदलून जिगाव प्रकल्प बधितांना जाणून बुजून त्यांच्या हक्कापासून डावलून टाकण्याचे काम सुरू झाले.
पण आधी याबाबत केलले पालकमंत्री असताना नमुना ड मिळावा याकरिता शासनाकडुन मार्गदर्शन मागवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. त्यामुळे यातील बारकावे माहिती असल्याने अधिकारी वर्गाला याबाबत योग्य मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, याबाबत बुलडाणा येथे बैठकी घेतल्याप्रसंगी आंदोलन केले. त्याचाच परिपाक म्हणून आज रोजी शासनाने नमुना ड संदर्भात जिल्हाधिकारी यांना मार्गदर्शन दिले असून, त्यात स्पष्ट नमूद केले आहे की, नमुना ड चा लाभ द्यावा.

त्यानुसार आता जिगाव प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळणार असून, त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला त्यांना मिळेल. याकरिता गेल्या 10 दिवसापासून आ. डॉ. संजय कुटे यांनी मुंबई येथे जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी दिनांक 1 सप्टेंबर 2020 रोजी मार्गदर्शन करिता पाठविलेल्या पत्राचा मंत्रालयात पाठपुरावा करून कक्ष अधिकारी, उपसचिव आणि सचिव यांचेशी सतत चर्चा करून योग्य आदेश प्राप्त करण्यात यश मिळविले आहे.

Advertisements
Previous articleविनापरवानगी कोरोना टेस्टिंग; अकोल्याच्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
Next articleबाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव सादर करा– जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here