अपहरण करून बालिकेवर अत्याचार

0
176

जळगाव जामोद. शाळेत फोटो काढायला चल असे म्हणून 6 वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील घाटपळशी येथे घडली. याप्रकरणी बालिकेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 45 वर्षीय इसमाविरुद्ध अपहरणासह बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील घाट पळशी येथील ६ वर्षीय मुलीचे आई-वडील कामासाठी शेतात  गेले होते. लहान भाऊ व 6 वर्षीय बालिका घरी एकटीच होती. दरम्यान घरी कोणीही नसल्याचे पाहून संजय दामोदर मांडवकर वय ४५ रा. वाघोळा ह.मु.रणथम ता. मलकापूर याने  शाळेत फोटो काढायचे आहेत असे म्हणून बालिकेचे अपहरण केले. मुलीला कुणीतरी दुचाकीवर घेवून जात असल्याची माहिती शेजारच्यांनी तत्काळ मुलीच्या आईवडीलांना दिली. माहिती मिळताच आईवडिलांनी पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनीही क्षणाचाही िवलंब न करता तपास सुरु केला. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया ढाकणे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार जाधव यांनी तपासचक्रे फिरवित नाकाबंदी केली. मुक्ताईनगर व दसरखेड पोलिसांशी संपर्क साधला. मुक्ताईनगर पोलीस व हॉटेल चालकाच्या मदतीने बालिकेचा शोध लावला. बालिकेची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यावरून आरोपी संजय दामोदर मांडवकर वय ४५ रा. वाघोळा ह.मु.रणथम ता. मलकापूर याच्याविरुद्ध कलम 363 नुसार अपहरणाचा गुन्हा व कलम 376 भादंवि नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक केली आहे.

Advertisements
Previous articleसन्मान कर्तृत्वाचा , जागर स्त्री शक्तीचा उपक्रम
Next articleअभविपची अकोला महानगर कार्यकारिणी घोषित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here