अभविपची अकोला महानगर कार्यकारिणी घोषित

0
165

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकाेला: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अकाेला महानगराची कार्यकारीणी 19 ऑक्टाेबरराेजी घाेषित करण्यात आली. यामध्ये महानगर अध्यक्षपदी डाॅ. संकेत काळे यांची तर महानगर उपाध्यक्ष म्हणून प्रा. श्रीकांत पाटील आणि डॉ. दीपिका गुप्ता तर महानगर मंत्री म्हणून अभिषेक देवर, महानगर सह-मंत्री म्हणून गुलशन तिवारी, आदित्य केंदले, विराज वानखडे व कोमल जोशी यांची निवड करण्यात आली. याशिवाय महाविद्यालय प्रमुखपदी शुभम काजे, महाविद्यालय सहप्रमुख अश्विनी पवार, विद्यार्थीनी प्रमुख जया सिडाम, विद्यार्थीनी सहप्रमुख मनिषा पजई, कार्यालय व कोष प्रमुख देवाशिष गोतरकर, सहप्रमुख जय आडे, राष्ट्रीय कलामंच प्रमुख अविनाश ताेडसाम, साेशल मिडियाप्रमुख प्रतिक देवतळे, एसएफएस प्रमुख ऋषीकेश पेठकर, सहप्रमुख विशाल वानरे, एसएफडी प्रमुख शुभम कचरे, सह प्रमुख प्रतीक सोळंके, जनजाती कार्यप्रमुख प्रितेश सिडाम, वैद्यकीय विद्यार्थी कार्य प्रमुख प्रणव वाकोडे, वैद्यकीय विद्यार्थी कार्य सहप्रमुख दीक्षा इंगळे. तंत्र शिक्षण विद्यार्थी कार्य प्रमुख निलय येरखडे, तंत्र शिक्षण विद्यार्थी कार्य सहप्रमुख आदित्य पवार, ऍग्रोविजन प्रमुख यश शिंदे, स्वाध्याय मंडळ प्रमुख अक्षय श्रीवास्तव यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी अभाविप अकोलाचे विभाग प्रमुख तथा निर्वाचन अधिकारी म्हणुन डॉ. राजीव बोरकर उपस्थित होते.

Advertisements
Previous articleअपहरण करून बालिकेवर अत्याचार
Next articleदारूच्या नशेत पत्नीची हत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here