अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेचे आयोजन

0
190

इच्छूकांनी 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत अर्ज करावे
बुलडाणा: केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळ,नवी दिल्ली यांच्या वतीने विविध खेळ प्रकारातील अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा दरवर्षी आयोजीत केल्या जातात. केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धासाठी विवीध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ, निवड चाचणी घेवून स्पर्धांसाठी पाठविले जातात.
राज्य शासनाकडून सचिवालय जिमखान्यास या स्पर्धासाठी महाराष्ट्र शासनाचा विवीध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्यांच्या प्रशिक्षण शिबीराची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे जिल्हयातील प्रशायकीय विभागात/ कार्यालयात किंवा आपल्या विभागाच्या अधिपत्याखालील असलेले कार्यालय/विभागामध्ये कार्यरत असलेले खेळाडू/ कर्मचा-यांच्या निदर्शनास सदर बाब आणून टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रीकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रीज, कॅरम, बुध्दीबळ, ॲथलेटीक्स, लघुनाटय, कबड्डी, वेटलिफ्टींग, पावरलिफ्टींग, शरीरसौष्ठव, कुस्ती, लॉनटेनिस, नृत्य व संगीत इत्यादी खेळ प्रकारात अखिल भारतीय भारतीय नागरी सेवा स्पर्धेतून ज्या खेळाडू/कर्मचा-यांना भाग घ्यावयाचा असेल (प्रत्येक खेळ प्रकारासाठी स्वतंत्र विहीत नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.) त्यांनी दि. 31 ऑक्टोंबर 2020 पुर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा नगरी जांभरून रोड, बुलडाणा येथे संपर्क साधून विहीत नमुण्यातील आवेदनपत्र प्राप्त करून घेवून, दिनांक 10.11.2020 पर्यंत, आवेदन पत्र सुअक्षरात भरुन, आपल्या कार्यालय प्रमुख/विभाग प्रमुख यांच्या मान्यतेने, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा येथे तीन प्रतीत अर्ज, आवश्यक प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह सादर करण्यात यावे , असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी केले आहे.

Advertisements
Previous articleजमिनीच्या आरोग्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करा
Next articleप्रधानमंत्री आवास योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा – खासदार प्रतापराव जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here