जुन्या येरळीतील वंचित प्रकल्पबाधितांना घराचा मोबदला द्या: आ.राजेशभाऊ एकडे यांनी मांडली प्रकल्पग्रस्तांची व्यथा

0
328

मंगेश फरपट|
वऱ्हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: भूसंपादन प्रकरण क्र.३३/२००९-१० येरळी (घरे) ता.नांदुरा चा निवाडा झालेला आहे. या निवाड्यातून काही घरे वगळली असल्याचे दिसून येते. या घरांचा सुध्दा मोबदला मिळावा यासाठी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना.डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार राजेशभाऊ एकडे यांनी वंचित प्रकल्पग्रस्तांना घराचा मोबदला देण्याची मागणी केली.
येरळी येथील गट नं ३४७ व ३४८ ची मोजणी करण्यात यावी, या गटांमधील घराचा मूळ गावठाणा प्रमाणे निवाडा करण्यात यावा, अतिक्रमित घरे व वाडग्याचा मोबदला अदा करावा, शेतीचे कलम १५(२), नमुना ड मान्य करावा, कलम ११ ते २१ पर्यंत झालेल्या कायदेशीर कारवाई प्रमाणे मोबदला त्वरित अदा करावा, येरळी येथील भूसंपादीत जमिनीचे व्यवहार सरळ खरेदीद्वारे करावे. या मुद्द्यांबाबत पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी देखील सहमती दर्शविली. या बैठकीस जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निलेश पाऊलझगडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवानभाऊ धांडे, जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य पुरुषोत्तम झाल्टे, येरळी येथील अतुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस चे नांदुरा शहर अध्यक्ष नितीन मानकर, महादेव पाटील, माजी सरपंच सुनील वेरुळकर, प्रल्हाद ढाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे, भूसंपादन, श्री.घुगे जिल्हाधिकारी भूसंपादन मध्यम प्रकल्प, श्री.सुपेकर अधिक्षक अभियंता,बुलडाणा पाटबंधारे विभाग बुलडाणा, श्री.राळेकर कार्यकारी अभियंता जिगाव प्रकल्प, श्री.संतोष सैतवाल उपअधीक्षक भूमी अभिलेख नांदुरा, श्री.काळे,अँड.अमित दळवी-पाटील, प्रकाश खिरळकर, सारगधर मुकुंद,वाल्मिक मुकुंद, पुरुषोत्तम पाटील, लक्ष्मण तांबे, महादेव पांडे व येरळी येथील वंचित प्रकल्पबाधित शेतकरी व नागरिक मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisements
Previous articleकपाशीवरील गुलाबी बोंडअळीवरील उपाययोजना
Next articleबुलडाण्यात आज 55 पॉझिटिव्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here