ऑनलाईन खरेदीत नांदुरेकरांची काेट्यवधी रुपयांची फसवणूक

0
316

मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क
नांदुरा जि. बुलडाणाः ऑनलाईन खरेदीत काेट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नांदुरा पाेलिस स्टेशनच्या हद्दीत 1 काेटी रुपयांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांनी दिली. सायबर क्राईम कंट्राेल पथक गुन्ह्यांचा शाेध घेत आहे.
काेराेनाच्या काळात व्यावसायीक प्रतिष्ठाने बंद असल्याने नागरिकांनी अॅानलाईन खरेदीस अनेकांनी प्राधान्य दिले. मात्र हीच संधी हेरून चाेरट्यांनी बँकेतून बाेलताे. तुमचे एटीएम ब्लाॅक झाले आहे. पेटीएम केवायसी करायची आहे. आधार कार्ड अपडेट करायचे आहे. आदी कारणे सांगून एटीम किंवा क्रेडीट कार्डचा सीव्हीसी किंवा पासवर्ड मागून पैसे हडप केल्याचे प्रकार 5 गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी नांदुरा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवला असून चाेरट्यांचा तपास सुरु आहे. ऑनलाईन खरेदी करतांना नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. तसेच बँकेसंदर्भात काेणतीही गाेपनिय माहिती देवू नये अशा प्रकारचे आवाहनही पाेलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here