बुलडाण्यात स्वाभिमानीने ठोकले महावितरण मुख्यालयाला कुलूप

0
464

मंगेश फरपट | वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

बुलडाणा: लॉकडाऊन काळातील संपूर्ण विज बिल माफ करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते मा.रविकांतजी तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा महावितरण मुख्यालयाला ‘स्वाभिमानी’च्या वतीने कुलूप ठोकण्यात आले.

आंदोलनाचा व्हिडिओ पहा-  https://youtu.be/dmGksgS2UQ4

तर यापेक्षाही उग्र आंदोलन: रविकांत तुपकर https://youtu.be/WE4huDBGsbA

ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विजबिल देणाऱ्या महावितरणचा यावेळी निषेध करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी व चळवळीतील जेष्ठ नेते एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वात आज सोमवार 27 ऑक्टोबर रोजी राज्यभर वीजबिल माफीसाठी आंदोलन करण्यात आले.  जर सरकारने वीजबिल माफ केले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला. या आंदोलनात ‘स्वाभिमानी’चे विदर्भ युवा कार्याध्यक्ष राणा चंदन, शे.रफिक शे.करीम, ज्ञानेश्वर कल्याणकर, महेंद्र जाधव, कडूबा मोरे, रशिद पटेल, दत्ता पाटील, गजानन गवळी, संतोष गवळी, मनोज जैस्वाल, रमेश जोशी, संकेत मेढे, शे.हारूण, रामदास खसावत, रघु खसावत, सैय्यद जहरोद्दीन, निखिल पाटील, सागर मेढे, संदीप पवार, अजाबराव तायडे, शुभम महाले, विठ्ठल चौथे, सुभाष जगताप, हरिदास पाटील, जयंत गवई यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisements
Previous articleआता शाळा सुरू कराव्यात, अकोल्यातील इंग्रजी शाळा संघटनांची मागणी
Next articleजिल्हा परिषदांच्या आरक्षणाबाबत 17 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here