स्वाभिमानीच्या दणक्याने पूरग्रस्तांना न्याय; मदत निधी शेगाव तहसिलला प्राप्त

0
243

श्याम अवथळे यांची आक्रमक भूमिका तर तुपकरांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

बुलडाणा: शेगांव-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांच्या नेतृत्वाखाली शेगाव तहसिल कार्यालयावर ढगफुटीमुळे आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी दु.12.00 वा.पासून आक्रोश आंदोलन करण्यात आले होते. श्याम अवथळे व जवळा पळसखेड, इतर गावातील पूरग्रस्तांनी आंदोलनाची आक्रमक भूमिका घेतली व तहसिल कार्यालयावर भाडेकुंडे घेऊन संसार थाटला होता. या आंदोलनादरम्यान रविकांत तुपकरांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलनाला मोठे यश आले आहे. ‘यामध्ये जुलै महिन्यात शेगाव तालुक्यात ढग फुटीमुळे पूर आला होता या पुरामुळे नागरी वस्ती व शेती चे मोठे नुकसान झाले होते व एक व्यक्ती चा मृत्यू झाला होता. याकुटुंबांना मदत मिळण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला मोठे यश प्राप्त झाले असून पुरा मध्ये मृत्यू झालेल्या व्यक्ती च्या कुटुंबाला 4 लाख रुपये मदत व पुरामुळे नुकसान झालेल्या 146 कुटुंबांना 7 लाख 30 हजार रुपयांचे सानूग्रह अनुदान बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शेगाव तहसिल कार्यालयाला प्राप्त झाली आहे. तसेच पुरामुळे 329 घरांचे नुकसान झाले होते त्यांना नुकसानभरपाई म्हणून 18 लाख रुपये अनुदान सोमवार पर्यंत प्राप्त होणार आहे.. ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनामुळे व श्याम अवथळे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे या पूरग्रस्त कुटुंबांना न्याय मिळणार आहे..

Advertisements
Previous articleपत्नीच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिला वृक्षसंवर्धनाचा संदेश
Next articleशेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही: डॉ. संजय कुटे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here