शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही: डॉ. संजय कुटे

0
233

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

जळगाव जामोद : बुलडाणा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेती खरडून गेली आहे. परंतु कृषी विभागाने शासनाकडे सादर केलेला बाधित अहवाल दिशाभूल करणारा असून यामुळे जिल्ह्यातील ९२ टक्के शेतकरी मदतीपासून वंचित राहणार असल्याचा आरोप करत मुखमंत्र्यांनी शेतक-यांसाठी जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी असून या निकषात जिल्ह्यातील अल्प शेतकरी पात्र आहेत. शेतकऱ्यांना दिवाळीपुर्वीच सरसकट मदत करावी अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा माजी मंत्री आमदार डाॅ. संजय कुटे यांनी दिला आहे.

Advertisements
Previous articleस्वाभिमानीच्या दणक्याने पूरग्रस्तांना न्याय; मदत निधी शेगाव तहसिलला प्राप्त
Next articleभरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत बापलेकासह 3 ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here