कोरोना अलर्ट : प्राप्त 1235 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 129 पॉझिटिव्ह

0
280

बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1364 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1235 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 129 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 98 व रॅपीड टेस्टमधील 31 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 743 तर रॅपिड टेस्टमधील 492 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1235 अहवाल निगेटीव्ह आहेत. आजपर्यंत प्राप्त झालेले सदर निगेटीव्ह अहवालांमध्ये आज प्राप्त निगेटीव्ह अहवाल सर्वात जास्त आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : जळगांव जामोद शहर : 4, जळगांव जामोद तालुका : खेर्डा 1, वाडी खुर्द 1, खामगांव शहर : 6, खामगांव तालुका : घाटपुरी 1, निमकवळा 6, वझर 9, झोडगा 3, शिरला 4, पिंप्री देशमुख 5, बुलडाणा शहर : 12, बुलडाणा तालुका : चौथा 1, चांडोळ 1, लोणार तालुका : पळसखेड 10, सुलतानपूर 2, वझर आघाव 1, जांभूळ 1, लोणार शहर : 13, मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : धानोरा 1, लोणी काळे 1, दे. साकर्षा 1, लोणी गवळी 2, दे. माळी 2, गोहेगांव 3, हिवरा आश्रम 1, दादुल गव्हाण 5, चिखली तालुका : रायपूर 1, मुरादपूर 1, शेलसूर 1, चिखली शहर : 6, मोताळा तालुका : सिंदखेड 4, मलकापूर शहर : 1, मलकापूर तालुका : वाकोडी 1, नांदुरा तालुका : भोटा 2, दे. राजा शहर : 6, दे. राजा तालुका : सिनगांव जहागीर 1, सावखेड 1,असोला 1, मूळ पत्ता जाफ्राबाद जि. जालना येथील 4 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 129 रूग्ण आढळले आहे. उपचारादरम्यान कोविड रूग्णालय, खामगांव येथे जळगांव जामोद येथील 83, स्त्री रूग्णालय बुलडाणा येथे शास्त्री नगर मलकापूर येथे 82 वर्षीय महिला, सव ता. बुलडाणा येथील 65 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 78 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : मोताळा : 1, दे. राजा : 3, मेहकर : 18,मलकापूर : 12, खामगांव : 5, सिं. राजा : 8, चिखली : 5, बुलडाणा : अपंग विद्यालय 20, आयुर्वेद महाविद्यालय 6.
तसेच आजपर्यंत 44152 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 8547 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 8547 आहे.
आज रोजी 2604 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 44152 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 9303 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 8547 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 631 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 125 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Advertisements
Previous articleभरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत बापलेकासह 3 ठार
Next articleमुलगी पाहण्यासाठी आलेल्या चेन्नईच्या कुटुंबाला अकोल्यात लुटले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here