भाजपा बुलडाणा जिल्हा सचिवपदी संजय शिनगारे

0
93

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
खामगाव: भारतीय जनता पार्टी चे बुलडाणा जिल्हाध्यक्ष तथा खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ऍड आकाशदादा फुंडकर यांनी कोजागिरी पौर्णिमे च्या मुहूर्तावर भाजपाची जिल्हा कार्यकारिणी जाहिर केली आहे.
या कार्यकारिणी मधे त्यांनी भारतीय जनता पार्टीचे खामगांव शहराध्यक्ष म्हणून सलग 2 टर्म जबाबदारी सांभाळनारे संजय शिनगारे यांची भारतीय जनता पार्टी बुलडाणा जिल्हा सचिव पदावर नियुक्ति केली आहे.
भाजपा चे दिवंगत जेष्ठ नेते तथा कृषी मंत्री स्व.भाऊसाहेबजी फुंडकर यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनखाली व आमदार एड.आकाशदादा फुंडकर यांच्या समर्थ नेतृत्वामधे त्यांनी आजपर्यंत भाजपा वार्ड अध्यक्ष, भाजपा युवामोर्चा शहर सरचिटणीस, भाजपा शहर सचिव, भाजपा खामगांव शहर अध्यक्ष अश्या विविध जबाबदारी पार पाडल्या आहेत.सोबतच 2014 पासून आमदार एड.आकाशदादा फुंडकर यांचे प्रतिनिधी म्हणून सामान्य रुग्णालय खामगांव येथे शासकीय रुग्णकल्याण नियामक समिति सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here