टेंट लायटिंग व साऊंड संचालकांच्या सदैव पाठीशी : सागरदादा फुंडकर ; भाजपचा आंदोलनाला पाठिंबा

0
169

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

खामगांव:  तालुका टेंट लाइटींग व साऊंड असोशियन च्या आंदोलनाला भाजपचे वतीने जाहीर पाठिंबा देत त्यांच्या हक्कासाठी नेहमी भक्कमपणे सोबत राहू अशी ग्वाही महाराष्ट्र सोशल मीडिया प्रदेश संयोजक सागरदादा फुंडकर यांनी दिली. आपल्या संघटनेचे आपल्या जिवन मरणाशी निगडीत प्रश्नं घेऊन आंदोलन करीत आहात आपल्या सर्व मागण्या रास्तं असून शासनाने लग्नं सोहळा स्वागत समारंभ व ईतर कार्यक्रम साठी ५०० लोकांची उपस्थितीची परवानगी द्यावी, मंदीर, धार्मीक कार्यक्रम राजकीय कार्यक्रम या साठी सुध्दा परवानगी द्यावी. तसेच मार्च महिन्यापासुन लॉकडाऊन सुरू असून सर्व उद्योग धंदे बंद आहेत. या व्यवसायातुन शेकडो लोक आपले पोट भरत असतात. तरी आपणांस आर्थीक मदत सुध्दा मिळावी यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचे मार्गदर्शनात या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलन मंडपात भेट देऊन जाहीर पाठींबा लेखी पत्राद्वारे देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र भाजपा सोशल मीडियाचे प्रदेश संयोजक यांनी आंदोलन कर्त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचेशी चर्चा केली. आपल्या पाठीशी भाजपा भक्कमपणे उभी असून येणाऱ्या दिवसात राज्य सरकार विरोधात आपल्या हक्कासाठी सदैव सोबत राहून न्याय मिळेपर्यंत लढा देऊ असे आश्वासन यावेळी सागरदादा फुंडकर यांनी दिले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, जिल्हा सचिव संजय शिनगारे , जिल्हा सदस्य तथा माजी नगराध्यक्ष गणेश माने, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, विजय महाले, वसंतराव वानखडे, शांताराम बोधे, यांचेसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisements
Previous articleभाजपा बुलडाणा जिल्हा सचिवपदी संजय शिनगारे
Next articleअमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here