पिंप्री कोळी गावचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणार: आ. राजेशभाऊ एकडे

0
358

मंगेश फरपट | वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

मलकापूर : विधानसभा मतदार संघ अंतर्गत नांदुरा तालुक्यातील पिंप्री कोळी या गावाची लोकसंख्या अंदाजे ७५० असून गावाला दर वर्षी तीव्र पाणी टंचाई जाणवते,गावा मध्ये फक्त एक कूपनलिका (बोअरवेल)असून त्या मधून सुध्दा खारे पाणी येत असते तसेच जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत तयार करण्यात आलेल्या आराखड्यात मतदार संघातील आवश्यक असलेल्या पाणी पुरवठा योजनांचा समावेश नव्हता. आवश्यक असलेल्या योजनांचा आराखड्यात समावेश व्हावा या अनुषंगाने मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांनी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील यांची त्यांच्या मुंबई स्थित निवास्थानी भेट घेऊन हिंगणे गव्हाड व १३ गाव पाणी पुरवठा योजनेत सदर गावाचा समावेश करण्यात यावा व जलजीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत मलकापूर तालुक्यातील दुधलगाव व २२ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची व मोरखेड व १० गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती करणे तसेच नांदुरा तालुक्यातील वडाळी व ८ गावे नवीन प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा जलजीवन मिशन च्या आराखड्यात समावेश करावा.अशी मागणी निवेदनाद्वारे केली मा.पाणी पुरवठा मंत्री महोदयांनी उपरोक्त बाबत विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक सूचना केल्या.त्यामुळे हिंगणे गव्हाड व १३ गाव पाणी पुरवठा योजने मध्ये पिंप्री कोळी चा समावेश होणार असून जलजीवन मिशनच्या आराखड्यात मलकापूर तालुक्यातील दुधलगाव व २२ गावे,मोरखेड व १० गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती व नांदुरा तालुक्यातील वडाळी व ८ गाव नवीन पाणी पुरवठा योजनेचा समावेश होणार आहे.यावेळी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉ.अरविंदजी कोलते,मलकापूर नगर परिषदेच्या अध्यक्ष अँड.हरीषभाऊ रावळ,मलकापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.बंदुभाऊ चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisements
Previous articleरेती चोरीची माहिती देणाऱ्याचा महसूल मित्र म्हणून केला जाणार गौरव
Next article1 हजाराची लाच घेणारा अमडापुरचा तलाठी अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here