1 हजाराची लाच घेणारा अमडापुरचा तलाठी अटक

0
298

अमडापूर ता. चिखली. शेतीवरील बोजा कमी करण्यासाठी शेतक-याकडून 1 हजार रुपयाची लाच घेतांना तलाठ्यास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई 4 नोव्हेंबरोजी संध्याकाळी अमडापूरच्या तलाठी कार्यालयातच एसीबीच्या पथकाने केली. गोविंद किसनराव चव्हाण वय 53 रा. शिवनगर जुनागाव ता. चिखली असे तलाठ्याचे नाव असून त्याने मंगरुळ नवघरे येथील एका शेतक-याला 1 हजार रुपयाची लाच मागितली होती. या तलाठ्याने एका शेतक-याला पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाचा बोझा कमी करण्यासाठी 1 हजार रुपयाची लाच मागितली होती. लाच लुचपत प्रतिबंध कायद्यान्वये तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements
Previous articleपिंप्री कोळी गावचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणार: आ. राजेशभाऊ एकडे
Next articleगळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here