अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला दहा वर्षाची शिक्षा

0
352

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस दहा वर्षे कारावासाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिने कारावास अशी शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश बी.एस.महाजन यांनी सुनावली. हा निकाल आज ७ नोव्हेेेंबर रोजी दिला.
पिडीत मुलीच्या वडीलांनी रायपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार २४ मार्च २०१९ रोजी सकाळी अकरा वाजता ते व त्यांची पत्नी जेवण करीत असतांना त्यांची अल्पवयीन मुलगी ही हापशी वरुन पाणी आणते, असे सांगून घरातून निघून गेली. परंतु ती पुन्हा घरी परत आली नाही. दरम्यान तिचा परीसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. या तक्रारीवरून पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर जवळपास तिन ते चार महिण्यानंतर पिडीत मुलगी ही मध्य प्रदेशातील आरोपी विजय उर्फ गबू कैलास करोसिया याचेकडे असल्याबाबतची माहीती मुलीच्या वडीलांना मिळाली. त्यांनी त्वरीत रायपूर पोलिस स्टेशनशी संर्पक साधला. त्यानंतर तपास अधिकारी सुनिल कांतीकर व पोलीस कर्मचारी सुरेश मोरे यांना सोबत घेवून मध्यप्रदेश येथील पिपलानी पोलिस स्टेशन गाठले. या ठिकाणी आरोपीसह पिडीत मुलीचा शोध घेतला असता ते मिळून आले. त्यानंतर पिडीत मुलीला विचारपुस केली असता आरोपीने तिच्याशी लग्न करतो, या बहाण्याने मध्यप्रदेश येथे त्याचे घरी बोलावून घेतले. त्यानंतर सतत तिन ते चार महिने तिच्यावर शारिरीक अत्याचार केले, असे सांगीतले. त्यामुळे या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कलम नुसार आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पुढील तपास सहायक पालिस निरीक्षक सुभाष दुधाळ यांनी केला. तपासा अंती दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले. प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने बारा साक्षीदारांचे साक्ष पुरावे नोंदविण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, पिडीता, आदिवासी समाजाचे तत्कालीन अध्यक्ष संदीप बरडे, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा चव्हाण व डॉ.निवृत्ती देवकर व तपास अधिकार्याची साक्ष महत्वपुर्ण ठरली. साक्षीदाराची साक्ष एकमेकांशी सुसंगत व घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने एकमेकांना पुरक असल्या कारणाने येथील सह जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.एस.महाजन यांनी आरोपी विजय उर्फ गबु कैलास करोसिया यास दोषी ठरवत दहा वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिण्याचा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. सोनाली सावजी देशपांडे यांनी काम पाहिले तर त्यांना कोर्ट पैरवी म्हणून ए.एस.आय. सरेश मोतीराम लोखंडे यांनी सहकार्य केले.

Advertisements
Previous articleकोरोना रुग्णसेवेत बुलडाण्याचा अटकेपार झेंडा ! केळवदचे डॉ. सोपान पाटील वाचविताहेत मुंबईचे प्राण
Next articleदिवाळीत जागरूकता ठेवा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here