दिवाळीत जागरूकता ठेवा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
355

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
मुंबई: दिवाळीनंतर पुढचे १५ दिवस जागरूकतेचे आहेत, त्यादृष्टीने सावधानता बाळगा आणि मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, हात वारंवार धुणे या नियमांचे पालन नागरिक करतील हे काटेकोरपणे पहा असेही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून कोविड संदर्भात उपाययोजनांची माहिती करून घेतली.
कोरोना वाढीचा दर व मृत्यूदर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमेमुळे आपण संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो असून डिसेंबरमध्ये ही मोहीम राबविण्याचे नियोजन करा अशा सुचना त्यांनी प्रशासनास दिल्या.

Advertisements
Previous articleअल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला दहा वर्षाची शिक्षा
Next articleठरलं! दिवाळीनंतर शाळेची घंटा वाजणार; मुख्यमंत्र्यांनी दिली हिरवी झेंडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here