ठरलं! दिवाळीनंतर शाळेची घंटा वाजणार; मुख्यमंत्र्यांनी दिली हिरवी झेंडी

0
732

मंगेश फरपट |
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

मुंबई: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळी नंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत दिले.
जागतिक परिस्थिती बघता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवाळीनंतर काही दिवस सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आले आहे,ते सेंटर बंद करता येणार नाही. अशा शाळा पर्यायी जागेत सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा.
शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी या सारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. जी मुले आजारी आहेत किंवा ज्या घरातील व्यक्ती आजारी आहे अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे.

Advertisements
Previous articleदिवाळीत जागरूकता ठेवा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Next articleमहाराष्ट्राचे कोरोना उपाययोजनेंतर्गत उल्लेखनीय कार्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here