जलसंधारणाची कामे करण्यासाठी निधी उपलब्ध होणार : आ. राजेशभाऊ एकडे

0
335

मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क

नांदुरा : मलकापूर विधानसभा मतदारसंघातील मलकापूर व नांदुरा तालुक्यांचा कायम अवर्षण प्रणव तालुक्यात समावेश आहे. त्याच प्रमाणे या दोन्ही तालुक्यातील पूर्णा नदीच्या तिरावरील गावे खारपानपट्ट्यातील आहे. या दोन्ही तालुक्यात जलसंधारणाची कामे करणे नितांत आवश्यक  आहे. या अनुषंगाने *मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकररावजी गडाख यांची भेट घेऊन मतदार संघातील जलसंधारणाच्या कामाचा अनुशेष बाबतची माहिती दिली. मलकापूर विधानसभा मतदार संघातील विश्वगंगा, नळगंगा व ज्ञानगंगा नदीवर शासनास सादर केलेल्या प्रस्थावास नदी पुनर्जीवन अंतर्गत बंधारे बांधण्या करिता निधी उपलब्ध करून द्यावा तसेच मलकापूर व नांदुरा तालुक्यातील जलसंधारणाच्या नवीन कामाचे सर्वेक्षण करून त्याची अंदाजपत्रक मंजूर करावी अशी मागणी निवेदनाद्वारें केली. जलसंधारणाच्या कामाचा अनुशेष लक्षात घेता मृद व जलसिंचन विभागाचे सचिव यांना सादर बाबतचा प्रस्थाव मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here