11 नोव्हेंबर रोजी रोजगार भरती मेळावा

0
98

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रतनलाल प्लॉट, अकोला येथे बुधवार दि.11 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेपासून कॅम्पस सिलेक्शनव्दारे मे. सुझुकी मोटर्स, गुजरात तर्फे रोजगार भरती मेळावा आयोजित केला आहे. त्याकरीता जोडारी, कातारी, विजतंत्री, टुल अँड डाय मेकर, प्लॅस्टीक प्रोसेसींग ऑपरेटर, मशिनिष्ट, यांत्रिक कर्षित्र, यांत्रिक मोटारगाडी, पेंटर जनरल,सीओई ऑटोमोबाईल सेक्टर या व्यवसायाच्या पात्र उमेदवारांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे पालन करुन  मुलाखतीकरीता कागदपत्रासह हजर रहावे.
उमेदवारांनी पॅनकार्ड, आधारकार्ड, आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्रांसह इतर सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीचे तीन संच व पाच फोटोसह कागदपत्र आणणे आवश्यक राहिल. इच्छूक उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे मुलाखतीकरीता उपस्थित रहावे असे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य एम. बी. बंडगर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here