अन्न व औषधी प्रशासन विभागाचे वराती मागून घोडे!

0
309

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : जिल्ह्याचे पालकमंत्री व अन्न औषध प्रशासन मंत्री डॉ. शिंगणे यांनी वरातीमागून घोडे दमटवत ऐन दिवाळीच्या दिवशी रोड शो केला. या रोड शो मध्ये विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सला भेट देवून केवळ दोघांवर कारवाई केली. दिवाळीत मोठया प्रमाणात मिठाई खेरदी होते.यात भेसळीचे प्रमाण वाढते. मात्र अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सचीन केदारे यांना आता पर्यत एकही भेसळीचा नमुना आढळून आला नाही. त्यांचे कर्तव्य आहे की, स्टॉलधारकांकडे खाद्यपदार्थ विक्रीचे लायसन्स आहे का ? ते स्वच्छता ठेवतात का?तयार केलेल्या मालाच्या पॅकेटवर एक्सपायरी डेट व इतर माहिती आहे की नाही? मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांना गेल्या वर्षा पासून दुध व अन्य पदार्थात भेसळ आढळून आली नाही. मात्र आज 14 नोव्हेंबर रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बुलडाणा शहरातील संगम चौक व इतर काही भागातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स व काही हॉटेलवर जाऊन स्वतः तपासणी केली, तसेच संगम चौक येथील 2 खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर त्यांना अनियमितता आढळल्याने त्यांनी या दोन्ही स्टॉलस्वर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी गुलाबसिंह वसावे यांना दिले आहे.आज लक्ष्मीपूजनच्या दिवशी पालकमंत्र्यांच्या कारवाईबाबत उलट सुलट चर्चेला उत आला होता.

Advertisements
Previous articleबुलढाण्यात मॉलला आग; इलेक्ट्रॉनिक दुकान जळून खाक
Next articleपंतप्रधानांनी साजरी केली शूर सैनिकांसोबत दिवाळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here