हेल्मेटमुळे तरुणाचा वाचला जीव, शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके यांची पुष्पगुच्छ देऊन व्यक्त केली कृतज्ञता

0
244

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: शहर वाहतूक शाखेतर्फे काही दिवसा पासून महामार्ग व प्रमुख रस्त्यावर दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती करीत आहे, विना हेल्मेट दुचाकी चालविणार्यांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागत आहे, काही नागरिकांनी ह्या मोहिमेला विरोध सुद्धा केला परंतु शहर वाहतूक शाखे कडून हेल्मेट सक्ती ची मोहीम सुरूच ठेवण्यात आली, ह्या मोहिमेचे सकारात्मक परिणाम समोर येण्यास सुरुवात झाली आहे. आज अकोल्यातील एका युवकाने शहर वाहतूक शाखेच्या हेल्मेट सक्ती मुळे त्याचा जीव वाचला ह्या कृतज्ञातेच्या भावनेतून स्वतः वाहतूक शाखेच्या कार्यालयात येऊन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे आभार व्यक्त केले.
अमित भरत राव देशपांडे रा न्यू तापडिया नगर हा तरुण स्वतः वकील असूनही एका औषध कंपनी मध्ये वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करतो. नौकरी निमित्ताने दररोज त्यांना वाशिम अकोला येणे जाणे करावे लागते त्या साठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी मोटार सायकल विकत घेतली होती, त्या वेळी त्यांना हेल्मेट सुद्धा मिळाले होते, परंतु हेल्मेट घालण्याची कटकट नको म्हणून त्यांनी कधीच हेल्मेट घातले नव्हते, परंतु मागील 15 दिवसा पासून शहर वाहतूक शाखेने महामार्ग व अकोल्यातून बाहेर जाणारे प्रमुख मार्गावर हेल्मेट सक्ती करून हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केल्याने, दंडात्मक कारवाई च्या भीतीने हेल्मेट घालणे सुरू केले होते, काल दिनांक 18।11।20 रोजी संध्याकाळी काम आटोपून वाशिम वरून अकोल्याला परत येत असतांना पिंजर गावा जवळ पुढे चालणाऱ्या दोन मोटारसायकली अचानक स्लिप होऊन पुढे घासत गेल्या त्या मुळे देशपांडे ह्यांनी ब्रेक दाबताच मागून येणाऱ्या मोटारसायकल ची धडक लागल्याने ते खाली पडून काही अंतर मोटारसायकल सह रस्त्यावर घासत गेले परंतु त्यांनी हेल्मेट घातलेले असल्याने किरकोळ खरचटले व थोडा मुका मार लागला, परंतु समोरील दोन्ही मोटारसायकल स्वार ह्यांनी हेल्मेट घातलेले नसल्याने त्यांचे डोक्यावर गंभीर इजा झाल्याने ते जागेवरच बेशुद्ध झाले, त्या मूळे त्यांना अंबुलन्स बोलावून अकोल्याला उपचार कामी पाठविण्यात आले, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. आपला जीव शहर वाहतूक शाखेच्या हेल्मेट सक्ती मुळेच वाचल्याची भावना ठेवून अमित देशपांडे ह्यांनी स्वतः शहर वाहतूक कार्यालयात जाऊन पुष्पगुच्छ देऊन शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके व शहर वाहतूक शाखेचे आभार व्यक्त केले, तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक ह्यांना प्रत्यक्ष भेटून अकोला पोलिसांचे हेल्मेट सक्ती बद्दल आभार व्यक्त करणार आहेत.

Advertisements
Previous articleहे तर ‘फ्युज’ उडालेलं सरकार! अकोला भाजपाची टीका    
Next articleपुण्याचे गडकोट अभ्यासक नरनाळा भेटीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here