पुण्याचे गडकोट अभ्यासक नरनाळा भेटीस

0
183

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: पुणे जिल्ह्यातील राजगुरू नगर,रांजणगाव भांबरडे येथील गडकोट अभ्यासक आपल्या गिरीभ्रमर ग्रुपच्या माध्यमातून सतत शिवकालीन इतिहास जीवंत ठेवणाऱ्या गडकोट, ऐतिहासीक स्थळांना भेटी देत असतात. त्यांनी आजपर्यंत पानिपत ते तंजावर पर्यंत जवळपास दीडशेच्यावर किल्ल्यांना भेटी देऊन महाराष्ट्राच्या अठरापगड जातींची शिवराज्य निर्मितीतील मुळुख वेगळी कामगिरी , शिवरायांची सर्वसमावेशक लोककल्याणकारी भूमिका जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी वेगवेगळ्या परिसरात जात असतात. ती मंडळी आज दिनांक १८ व १९ नोव्हेंबरपर्यंत विदर्भातील प्रसिद्ध किल्ले नरनाळा व गाविलगड चा अभ्यास करण्याकरिता दोन दिवस अकोटकरांच्या सहवासात होती.नरनाळा किल्ल्याचे भव्य आणि सुस्थितीतील प्रवेशद्वार ,इतर वस्तूंचे अवशेष, प्रचंड मोठी नऊगजी तोफव इतर शक्कर तलाव,सभागृह व किल्ला परिसरातील प्रेक्षणीय स्थळे पाहून गिरीभ्रमर ग्रुपचे श्री विठ्ठल देशमुख, श्री हनुमंत जगताप , श्री रविंद्र निंबाळकर, दत्तात्रय बोडरे ,श्री दिपक रेटवडे यांनीआश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या सोबत अकोट येथील शिवतीर्थ प्रतिष्ठानचे श्री संतोष झामरे, प्रविण सिरस्कार, अमर भागवत, राजेश अढाऊ, अजय अरबट, आश्विन हिंगणकर, महेंद्र काकड, विजय सरोदे, मानिराम कासदे, अनिल काळे,विष्णू झामरे,चंद्रशेखर काळने हे होते. संध्याकाळी पश्चिम महाराष्ट्रातील पाहुण्यांचे वर्हाडी पद्धतीने स्वागत केले. सहविचार सभा आयोजित करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्राला एका धाग्यात ओवण्याचे सामर्थ्य शिवचरीत्रात आहे, हा सूर सर्वांच्या मनोगतातून निघाला. पाहुण्यांनी मावळ परिसरातील गडकोटांना भेटीचे निमंत्रण अकोट च्या मंडळींना दिले. याप्रसंगी प्रा.डॉ. प्रशांत कोठे,प्रा.वाल्मीक भगत, प्रा.राजेंद्र पुंडकर, डॉ. सुहास कुलट,अविनाश डीक्कर, रत्नाकर रेळे, निलेश काळे, संदीप सावरकर,नंदकिशोर पोटदुखे,निलेश पूनकर यांची उपस्थिती होती.

Advertisements
Previous articleहेल्मेटमुळे तरुणाचा वाचला जीव, शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके यांची पुष्पगुच्छ देऊन व्यक्त केली कृतज्ञता
Next articleध्येय’वेडा’ : पुरुषोत्तम शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here