जिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतीचे निवडणूकीकरीता मतदार यादी कार्यक्रम घोषीत

0
111

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: राज्य निवडणूक आयोगाने माहे एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम घोषीत केला आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील 34, अकोट तालुक्यातील 38, मुर्तिजापूर तालुक्यातील 29, अकोला तालुक्यातील 36, बाळापूर तालुक्यातील 38, बार्शिटाकळी तालुक्यातील 27, तर पातुर तालुक्यातील 23 ग्रामपंचायत, असे एकूण 225 ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणूकीकरिता मतदार यादीचा कार्यक्रम घोषीत केला आहे.

प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा मंगळवार दि.1 डिसेंबर रोजी, हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2020 पर्यंत तर प्रभागनिहाय अंतिम यादी गुरुवार दि. 10 डिसेंबर रोजी प्रसिध्दी करण्यात येईल. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दि. 25 सप्टेंबर 2020 राहिल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here