रॅपिड अँटिजेंट टेस्ट, 106 चाचण्या

0
74

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

अकोला: कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 106 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण व अकोट येथे चाचण्या झाल्या नाही, बाळापूर येथे सात चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बाळापूर येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, मुर्तिजापूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, 16 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, वैद्यकीय महाविद्यालय येथे 55 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर हेडगेवार लॅब येथे सात चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे दिवसभरात 106 चाचण्यांमध्ये नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आजपर्यंत 24721 चाचण्या झाल्या त्यात 1748 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here