एमपीएससी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार

0
205

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
मुंबई: एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या दोन-तीन दिवसांत एमपीएससी (MPSC) परीक्षांची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी नेत प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी दिली आहे. या विषयी ओबीसी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेनंतर लवकरच परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील, असे आश्वासन ठाकरे यांनी दिल्याचा दावा प्रकाश शेंडगे यांनी केला. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. (date of MPSC exams will be announced in next two-three days said Prakash Shendge)
“मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या विषयावर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्याशी या विषयी चर्चा केली. येत्या दोन ते तीन दिवसांत एमपीएससीच्या परीक्षांची तारीख (date of MPSC exams) जाहीर होईल,” अशी माहिती प्रकाश शेंडगे यांनी दिली. तसेच, ओबीसी विद्यार्थ्यांनी तणावाखाली राहू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचेही शेंगडे यांनी सांगितले.

 

Advertisements
Previous articleरॅपिड अँटिजेंट टेस्ट, 106 चाचण्या
Next article344 अहवाल प्राप्त; 35 पॉझिटीव्ह, 92 डिस्चार्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here