344 अहवाल प्राप्त; 35 पॉझिटीव्ह, 92 डिस्चार्ज

0
168

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

अकोला: आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 344 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 309 अहवाल निगेटीव्ह तर 35 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्याच प्रमाणे काल (दि.27) रॅपिड एटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  9333 (7448+1708+177) झाली आहे. आज दिवसभरात  रुग्णालयात असलेल्या 10 तर होम आयसोलेशन मध्ये असलेल्या 82 रुग्णांना घरी सोडण्यात आले,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 54053 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 52687  फेरतपासणीचे 244 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1122 नमुने होते. आजपर्यंत एकूण 53690 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 46242 तर पॉझिटीव्ह अहवाल 9333 (7448+1708+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

Advertisements
Previous articleएमपीएससी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार
Next articleगळफास घेवून युवतीची आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here