शहीद जवान यश देशमुख अमर रहे!

0
116

जळगाव: ‘शहीद यश देशमुख अमर रहे’ च्या जयघोषात इन्फन्ट्री बटालियन 101 मध्ये कार्यरत असलेले शहीद जवान यश दिंगबर देशमुख यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12 वाजता त्यांच्या मूळगावी पिंपळगाव,  ता. चाळीसगाव, जि. जळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुरुवार 26 नोव्हेंबर, 2020 रोजी दुपारी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात यश देशमुख यांना वीरगती प्राप्त झाली होती. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पिंपळगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here