निमगावच्या आरोग्य केंद्रासाठी ई क्लास जमिन हस्तांतरणासाठी विलंब! पंतप्रधानांच्या पत्राकडेही मुख्य सचिवांचा कानाडोळा!

0
306

व-हाड दूत न्युज नेटवर्क 
नांदुरा जि. बुलडाणा: निमगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणी बाबत मा. प्रधानमंत्री कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांना योग्य त्या कार्यवाहीबाबत निर्देश प्राप्त होऊनही अद्याप ग्रामपंचायत निमगाव चे नावे म्हणजे  शासनाचेच नावे असलेली ई क्लास जमीन केवळ हस्तांतरित करण्यासाठी विलंब होत आहे. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा निमगाव येथील रहिवासी प्रमोद खंडागळे यांच्याकडून राज्याचे मुख्य सचिव यांनी मेलद्वारे स्मरणपत्र सादर केले आहे. त्यांनी पाठवलेले पत्र त्यांच्याच शब्दांत… आपणही या विषयाशी सहमत असाल तर आपल्या प्रतिक्रिया बातमीखाली कमेंट बाॅक्स मध्ये नोंदवाव्यात.. 
————
प्रति,
मा.श्री अजोय मेहता साहेब (आय.ए.एस)
मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-४०००३२

मा.महोदय, सप्रेम नमस्कार..
महोदय, सविनय सादर करतो की, मा. प्रधानमंत्री महोदय यांचेकडे दि. ०६/०९/२०१९ रोजी सादर निवेदनात, निमगाव ता.नांदुरा जि. बुलडाणा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीबाबत यंत्रणेची अनास्था व कमालीची दिरंगाई विषद केली होती. त्याचप्रमाणे सदर प्रा.आ.केंद्र त्वरित जनहितासाठी उभारणी करणेबाबत योग्य ते निर्देश देणेबाबत प्रार्थना केली होती. त्याच्या प्रतीसादास्वरूप मा. प्रधानमंत्री कार्यालयाकडून आपणास उद्देशून  पत्र क्र.No.PMOPG/D/2019/0345685 DT. 18/9/2019 नुसार योग्य ती कार्यवाही करून निवेदन सादरकर्ता म्हणून मला कळविण्याबाबत निर्देशही देण्यात आले होते. मात्र अत्यंत खेदाने नमूद करावेसे वाटते कि, एवढ्या महत्वाच्या जनहितार्थ प्रश्नाबाबत मात्र आपणाकडून अद्यापही काहीही कळविण्यात आलेले नाही. याचाच अर्थ मा.पंतप्रधान कार्यालयाच्या पत्रासही आपण गांभीर्याने घेतलेले नाही हे स्पष्ट होते.
महोदय सदर प्रकरणी परिस्थिती अशी आहे कि, ग्रामपंचायत निमगावच्या नावे म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. बुलडाणा यांचेकडेच सर्वस्वी अधिकार असणारी जमीन केवळ जिल्हा आरोग्य अधिकारी बुलडाणा यांना हस्तांतरित करणे एवढे साधे कामही करायला वर्ष लागते यावरुन यंत्रणेचा जनहिताच्या कामासाठी असणारा वेग आणि केवळ श्रेयाच्या दर्जाहीन उठाठेवीत लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष याची कल्पना येण्यास पुरेसे आहे. आणि सर्वोच्च अधिकारीतेकडे गाऱ्हाणे मांडूनही त्यानुसार निर्देशांना अडगळीत टाकल्या जाते हि अत्यंत दुखद आहे.ठीक आहे कोरोना आपत्तीमुळे आपणास वेळ मिळालाही नसेल कदाचित पण आम्ही सामान्य जनता मात्र आपणाकडे असामान्य कर्तुत्वाचे धनी म्हणून पाहतो. आता यात आमचा काही दोष असेल तर क्षमस्व.
महोदय, सर्वात वाईट हे वाटते कि, आम्ही जनतेनेच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जेव्हा जनतेच्याच समस्यांकडे पाठ फिरवतात. आणि यांच्या श्रेयाच्या गचाळ राजकरणात जनता आरोग्य विषयक मुलभूत हक्कांपासून वंचित राहते.  याकरीता आपणास नम्र प्रार्थना आहे कि, याप्रकरणाची तातडीने चौकशी व्हावी आणि निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध असलेली व ग्रामपंचायतने देण्यास सहमतीसुद्धा दिलेली जमीन त्वरित जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प बुलडाणा यांना हस्तांतरित करणेबाबत आपण आदेश निर्गमित करून त्याबाबत कळविण्याची तसदी ह्यावी हि नम्र विनंती. आपणाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा. धन्यवाद.

आपला नम्र,
प्रमोद नारायण खंडागळे
निमगाव ता. नांदुरा जि. बुलडाणा ४४३४०४
मो.नं. ९४२२४९९५०७

Advertisements
Previous articleतेव्हा राधासुता कुठे गेला होता तुमचा धर्म ? डॉ.नीलम गोऱ्हे, शिवसेना प्रवक्त्या यांचा घणाघात
Next articleपदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचा निवडणूकीवर बहिष्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here