शिक्षक मतदारसंघ निवडणूक; आचारसंहिता भंग प्रकरणी आठ गुन्हे दाखल

0
166
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अमरावती: आचारसंहितेचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यावरून अद्यापपर्यंत आठ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अमरावती जिल्ह्यात नीलेश ताराचंद विश्वकर्मा यांच्याविरुद्ध विनापरवानगी रॅलीचे आयोजन केल्याबद्दल, तसेच श्रीकांत देशपांडे यांच्याविरुद्ध विनापरवानगी प्रचारसभेचे आयोजन केल्याबद्दल, डॉ. नितीन धांडे यांच्याविरुद्ध विनापरवानगी प्रचारसभेचे आयोजन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात रामदासपेठ पोलीस ठाण्यात श्रीकांत देशपांडे यांच्याविरुद्ध विनापरवानगी सभेचे आयोजन केल्याबद्दल, तर बुलडाणा जिल्ह्यातील चिखली पोलीस ठाण्यात डॉ. नितीन धांडे यांच्याविरुद्ध विनापरवानगी प्रचारसभेचे आयोजन, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलीस ठाण्यात किरणराव सरनाईक यांच्याविरुद्ध मतदारांना साड्या, पैसे यांचे प्रलोभन देण्याचा प्रयत्न केल्यामुळे गुन्हा दाखल आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर पोलीस ठाण्यात चंद्रकांत पाकधाने व इतर सात यांच्याविरुद्ध शासकीय जागेचा वापर केल्याबद्दल, तर वाशिम पोलीस ठाण्यात किरण सरनाईक यांच्याविरुद्ध मतदारांना साड्या, पैसे यांचे प्रलोभन देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Advertisements
Previous articleअधिकारी बनणे झाले आता सोपे, गावात अभ्यासिकेसाठी तरुणांचा पुढाकार
Next articleनिवडणूकीतील ‘सोनं’ म्हणजे “तुमचं एक मत”.. ज्याला कोणालाही द्याल.. विचार करून द्या!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here