निवडणूकीतील ‘सोनं’ म्हणजे “तुमचं एक मत”.. ज्याला कोणालाही द्याल.. विचार करून द्या!

0
254

शिक्षक मतदारसंघ निवडणूक
असं म्हटलं जातं. समाजाचा जो आहे रक्षक, तो आहे खरा शिक्षक!
लोकशाहीमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीलाही इतर निवडणूकांप्रमाणे महत्व प्राप्त झाले आहे.
शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या  1 डिसेंबररोजी होत आहे. प्रचारतोफा 29 नोव्हेंबररोजी संध्याकाळी थंडावल्या. अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघात 27 उमेदवार रिंगणात आहेत. नावाने व चेह-यानेही अनोळखी असणा-या या उमेदवारांच्या व्हॉट्सअप  मॅसेजचा पाऊस आता शिक्षक मतदारांच्या मोबाईलवर पडत आहे. त्यामधूनच त्यांची आेळख मतदारांना होत आहे. एवढेच नव्हेतर दिवसाला सात ते आठ वेळा फोन कॉल्स व प्रचाराचे मॅसेज गेल्या 15 दिवसापासून सातत्याने शिक्षक मतदारांना येत आहेत. यामध्ये सुद्धा खासगी शाळांमधील शिक्षक जो कुणाच्या गिणतीत देखील नसावा त्यांची देखील या उमेदवारांना प्रकर्षाने आठवण येत आहे हे विशेष!
खासगी शाळांमधील शिक्षकांचे प्रश्न त्यांना मिळणारे तुटपुंजे वेतन हे प्रश्नही कुणाच्या गावी नसावेत. एवढेच काय लॉकडाउनच्या काळात अनेक खासगी शाळांमधील शिक्षकांना वेतन मिळाले नाही. कित्येकांना नोक-या गमवाव्या लागल्या. कुणावर भाजी विकण्याची तर कुणाला शेतात मजूरी करण्याचीही वेळ आली. कित्येक शिक्षकांवर उपासमारीची पाळी आली. त्यावेळी मात्र विद्यमान किंवा भावी शिक्षक नेते कुणाचेही याकडे लक्ष देखील गेले नाही. तेच उमेदवार आज शिक्षकांना पैठण्या, भेटवस्तू व पैशांचे पाकिट वाटप करीत आहेत. परंतू शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करीत असलेल्या माझ्या शिक्षक बंधू – भगिनींनी या प्रलोभनांना बळी पडणे कितपत योग्य आहे, हे त्यांचे त्यांनीच ठरवावे. या अमिषांना बळी न पडता लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होवून जो उमेदवार खरोखरच आपल्या प्रश्नांची जाण ठेवून प्रयत्न करेल, अशाच उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याची गरज वाटते.
कारण निवडणूकीतील ‘सोनं ‘ म्हणजे “तुमचं एक मत” .. ज्याला कोणालाही द्याल.. विचार करून द्या!

  • अर्चना योगेश फरपट
    संपादक, व-हाड दूत, अकोला
Advertisements
Previous articleशिक्षक मतदारसंघ निवडणूक; आचारसंहिता भंग प्रकरणी आठ गुन्हे दाखल
Next article1 डिसेंबररोजी होणा-या शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी यंत्रणा सुसज्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here