आमदार रोहित पवार यांनी घेतली शेळके परिवाराची भेट

0
476

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : एका कार्यक्रमानिमित्त बुलडाणा येथे आले असता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहितदादा पवार यांनी रविवारी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या निवासस्थानी सदिच्छया भेट दिली. यावेळी त्यांचे कौटुंबिक स्वागत करण्यात आले.
आ. रोहीतदादा पवार रविवारी एका कार्यक्रमानिमित्त बुलडाणा येथे आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी श्री. शेळके यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी राजर्षी शाहू फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमांबद्दल त्यांनी चर्चा केली. शाहू फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याला त्यांचे नेहमीच मार्गदशन लाभले आहे. त्यांच्या विचारांची कास धरुन संस्थेची वाटचाल सुरू आहे. भेटीप्रसंगी त्यांनी फाऊंडेशनच्या कार्याची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. आ. रोहितदादा यांचा युवकांमधे मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच भेटीसाठी त्यांनी हजेरी लावली होती. पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासह अनेक युवकांनी त्यांच्यासोबत फोटो काढले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी शंतनु बोन्द्रे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर बोन्द्रे, स्काउट गाइडचे जिल्हाध्यक्ष नितीन शिंगणे, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस जयश्रीताई शेळके, आशीष रहाटे, पंकजनाना बोराडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Advertisements
Previous article1 डिसेंबररोजी होणा-या शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी यंत्रणा सुसज्ज
Next articleज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here