शिक्षक मतदारसंघ निवडणूक; सकाळी 10 वाजेपर्यंत विभागात सरासरी 10.11 टक्के मतदान

0
86

मंगेश फरपट |
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
खामगाव: विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी १ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत सुरू होती. पहिल्या टप्प्यात सकाळी 10 वाजेपर्यंत अमरावती विभागातील मतदान केंद्रावर सरासरी 10.11 टक्के मतदान झाले. अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात बुलडाणा जिल्ह्यात 7 हजार 422 शिक्षक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये 5 हजार 927 पुरुष तर 1 हजार 495 स्त्री मतदार आहेत. जिल्ह्यात प्रत्येक तहसिल कार्यालयात मतदान केंद्र आहे. खामगाव तहसिल कार्यालय मतदान केंद्रावर उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र जाधव यांच्या नियंत्रणात मतदान प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थेत सुरू असल्याचे दिसून आले.
मतदान केंद्र कोरोना विषाणू संसर्ग सुरक्षासाठी निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. सोशल डिस्टसिंग नियमांचे पालन करण्यासाठी आखणी करण्यात आली आहे.

सकाळी 10 पर्यंत झालेले मतदान

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here