सरपंच पदांचे महिला आरक्षण काढण्यात येणार उपविभाग निहाय !

0
127

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 870 ग्राम पंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2020 ते 2025 दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या सरपंच पदांचे आरक्षण 7 डिसेंबर 2020 रोजी तहसिल स्तरावर निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार हे निश्चित करणार आहे.
तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रीयांकरीता व खुल्या प्रवर्गाअंतर्गत स्त्रीयांकरीता आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली 10 डिसेंबर रोजी स. 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. मात्र कोरोना संसर्ग सुरक्षा नियम, सुचना व आदर्श कार्य प्रणालीचे पालन होण्यासाठी उपविभाग निहाय सरपंच पदांचे महिला अरक्षण काढण्यात येणार आहे.
बुलडाणा उपविभाग बुलडाणा व चिखली तालुक्यांसाठी सकाळी 11 वाजता, सिं. राजा उपविभागातील सिं.राजा व दे. राजा तालुक्यांसाठी दु. 12 वाजता, मेहकर उपविभाग मेहकर व लोणार तालुक्यांसाठी दु. 12.30 वा, खामगांव उपविभागातील खामगांव व शेगांव तालुक्यांकरीता दु 1 वाजता, जळगांव जामोद उपविभागातील जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यांसाठी दु 1.30 वाजता आणि मलकापूर उपविभागातील मलकापूर, मोताळा व नांदुरा तालुक्यांकरीता दु 2 वाजता वेळ नियोजित केलेली आहे. तरी याबाबतची नोंद सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरीकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.

Advertisements
Previous articleविधानपरिषदेच्या सहा जागांसाठी अंदाजे सरासरी ६९.०८ टक्के मतदान
Next articleअकोल्यात आजपासून सुपरस्प्रेडर्सच्या चाचण्यांना सुरुवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here