शेतक-यांसाठी युवक काँग्रेसचे अकोल्यात उपोषण; राजधानीतील आंदोलनाला दिला पाठिंबा

0
241

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: केंद्र शासनाने शेतकरी विरोधी 3 कायदे पारित केल्याच्या विरोधात दिल्लीला सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शेतक-यांबाबत युकाँ कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केली.
शेतकरी विविध समस्यांचा सामना करीत असताना दुसरीकडे मात्र शेतकरी, कामगार विरोधी कायदे तयार करुन केंद्र शासन त्यांची मुस्कटदाबी करीत आहे. लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केंद्राने चालवला आहे. काँग्रेसने हा विषय सुरुवातीपासून हाती घेतला असून यापूर्वीही याविषयी आंदोलने झालीत. स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली परंतु तरीही केंद्र शासन मानायला तयार नाही. त्यामुळे शासनावर दबाव आणण्यासाठी आंदोलन असल्याचे महेश गणगणे, अंशुमन देशमुख यांनी या वेळी बोलताना सांगितले. विविधस्तरावर सुरू असलेला लढा मागण्यांची पूर्तता होईस्तोवर सुरुच राहील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनात युवक काँग्रेस कार्यकर्ते लढायला सज्ज आहेत. युवकांची शक्ती एकत्रितपणे केंद्र शासनाला कायद्यांबाबत फेरविचार करायला भाग पाडतील, असा निर्धार देखील यावेळी व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते लढ्यासाठी सज्ज आहेत, आम्ही शक्तीने लढू, असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी युवक काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष अंशुमन देशमुख, जिल्हाध्यक्ष अॅड. महेश गणगणे, प्रदेश महासचिव सागर कावरे, विवेक गावंडे, राहुल थोटांगे, शहर काँग्रेसचे महासचिव कपिल रावदेव, प्रदेश प्रवक्ता कपिल ढोके,निलेश चतरकर,अक्षय इमानदार, रणजित कवटकार, गणेश केवट, अंकुश भेंडेकर, बादशाह खान, सै. आरीफ, बबलू मिर्जा, शुभम देशमुख, निरज खडसे, मंगेश आव्हाडे आदी उपस्थित होते.
सुरुवातीला, माजी जि. प. सदस्य रमेश म्हैसने यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश तायडे, विजय शर्मा यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिका-यांनी उपोषणस्थळी भेट दिली. केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा तीव्र निषेध करण्यात आला.

Advertisements
Previous articleअकोल्यात आजपासून सुपरस्प्रेडर्सच्या चाचण्यांना सुरुवात
Next articleएक असाही विवाह; तरुणीने घडविला आदर्श

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here