अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; पहिल्या फेरीत किरण सरनाईक आघाडीवर!

0
273

व-हाड दूत न्युज नेटवर्क

अमरावतीः अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या निकालाची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. मतमाेजणीच्या पहिल्या फेरीचा निकाल जाहिर झाला असून यामध्ये किरण सरनाईक यांना क्रमांक 1 च्या पसंतीची मते मिळाली आहेत.

पहिल्या फेरीचा निकाल
पहिल्या राउंडमध्ये वैध 13 हजार 999 मतांपैकी 488 अवैध व 13 हजार 511 मते वैध ठरली. या फेरीतील मते अशी : डॉ. नितीन धांडे- ६६६, श्रीकांत देशपांडे – २३००, अनिल काळे – १२, दिलीप निंभोरकर- १५१, अभिजित देशमुख – ९, अरविंद तट्टे- १३, अविनाश बोर्डे- ११७४, आलम तनवीर- ९, संजय आसोले- ३०, उपेंद्र पाटील- २१, प्रकाश कालबांडे- ४३७, सतीश काळे-७८, निलेश गावंडे- ११८३, महेश डावरे-१४१, दिपंकर तेलगोटे-६, डॉ. प्रवीण विधळे-७, राजकुमार बोनकिले-३४८, शेखर भोयर- २०७८, डॉ. मुश्ताक अहमद- ८, विनोद मेश्राम – ७, मो. शकील- १४, शरद हिंगे- २५, श्रीकृष्ण ठाकरे- १०, किरण सरनाईक – ३१३१, विकास सावरकर – ३१४, सुनील पवार- ३५, संगीता शिंदे- १३०४. काही वेळापूर्वीच दुस-या फेरीला सुरुवात झाली आहे.

Advertisements
Previous articleमहाराष्ट्रातील सुंदर पर्यटन स्थळ: लोणावळा
Next articleनिकालाची उत्कंठा अन चिअर्सची प्रतिक्षा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here