किरण सरनाईक यांचा विजय निश्चित! देशपांडे दुस-या तर भाेयर तिस-या क्रमाकांवर

0
542

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अमरावती: विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पहिल्या पसंतीच्या मतमोजणीअंती अटीतटीची लढत होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये वाशीमचे अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर असून महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे दुसऱ्या व अपक्ष शेखर भोयर तिसऱ्या स्थनावर आहे. विजयासाठी 14 हजार 916 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.

विलास नगर येथील शासकीय गोदामात गुरुवार 3 डिसेंबरला सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण 14 टेबलवर ही मोजणी हाती घेण्यात आली. दोन फेरीमध्ये पहिल्या पसंतीची वैध मते मोजण्यात आली. त्यामध्ये वाशीमचे अपक्ष किरण सरनाईक 6 हजार 88 मते घेऊन पाहिल्या स्थानावर राहिले. महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे 5 हजार 122 मते घेऊन दुसऱ्या तर अपक्ष शेखर भोयर 4 हजार 889 मते घेऊन तिसऱ्या स्थानावर होते. भाजपच्या डॉ. नितीन धांडे यांना 2 हजार 127, अनिल काळे यांना २६, दिलीप निंभोरकर यांना ५५५ अभिजित देशमुख यांना २३, अरविंद तट्टे यांना ७९ मते, अविनाश बोर्डे यांना २७४७ मते, आलम तनवीर यांना २६ मते, संजय आसोले यांना १०४ मते, उपेंद्र पाटील यांना ३५ मते, प्रकाश काळबांडे यांना १२१९ मते, सतीश काळे यांना ८९ मते, निलेश गावंडे यांना २१२२ मते, महेश डावरे यांना २९० मते, दिपंकर तेलगोटे मते यांना १६ मते, डॉ. प्रवीण विधळे यांना १६ मते, राजकुमार बोनकिले यांना ५७२ मते, डॉ. मुश्ताक अहमद यांना २५ मते, विनोद मेश्राम यांना १५ मते, मो. शकील यांना ३२ मते, शरद हिंगे यांना ५४ मते, श्रीकृष्ण ठाकरे यांना २० मते, विकास सावरकर यांना ६२५ मते, सुनील पवार यांना ५६ मते, संगीता शिंदे २८५७ मते पहिल्या पसंतीची मिळाली. दोन्ही फेऱ्या मिळून एकूण ३० हजार ९१८ मतांपैकी २९ हजार ८२९ मते वैध ठरली तर १ हजार ८९ मते अवैध ठरली. त्यानुसार २९ हजार ८२९ या वैध मतांना भागीले दोन अधिक एक असे सूत्र वापरून 14 हजार 916 कोटा विजयासाठी निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या पसंतीची मते घेऊन कोणताच उमेदवार कोटा पूर्ण करू शकत नसल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू करण्यात आली. ही बाद फेरी राहणार आहे.

किरण सरनाईक यांचा थाेडक्यात परिचय 
अमरावती शिक्षक मतदारसंघातून किरण सरनाईक हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. सरनाईक वाशिम येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, 1988 साली अकोला जिल्ह्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष, मागील 50 वर्षांपासून सरनाईक घराणं काँग्रेस पक्षासोबत, किरण सरनाईक माजी आमदार मालतीबाई सरनाईक (काँग्रेस) यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. 

Advertisements
Previous articleग्लाेबल टीचर अवाॅर्डससाठी साेलापूरचे रणजितसिंह डिसले यांची निवड; महाराष्ट्राचा सन्मान वाढवला
Next articleरेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी निघाला ‘सकाळ’चा संपादक, 6 लाखात दिली हत्येची सुपारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here