धक्कादायकः बुलडाण्यात शासकीय बालसुधारगृहात दोन मुलांची आत्महत्या

0
586

मंगेश फरपट | 
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: येथील शासकीय बालसुधारगृहात दोन मुलांनी शुक्रवारी, 4 डिसेंबररोजी रात्री आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेने जिल्हयात ख्रळबळ उडाली आहे.
चिखली रोडवरील शासकीय मुलांचे निरिक्षक गृह आहे. त्याठिकाणी दोन मुलांचे बंद खोलीत गळफास लावून लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले. मंगेश लक्ष्मण डाबेराव वय 15 व गजानन शंकर पांगरे वय 17 अशी मृतक मुलांची नावे आहेत. मृतदेह आढळलेल्या खोलीत 3 मुले होती. यापैकी 1 मुलगा सुखरूप असून जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया यांच्यासह शहर पोलिस घटनास्थळी पोहचले. पुढील तपास सुरु आहे. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here