महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ हिसकावून पोबारा

0
225

राम पाटील

खामगाव: फुटाणे विक्री करून घरी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ अज्ञात चोरट्याने हिसकावून पोबारा केला. ही घटना स्थानिक जलालपुरा टि पॉईट जवळ ३ डिसेंबर रोजी घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गोपाळ नगर भागातील सौ.निर्मला अंबादास किरकाळे या महिलेचा फुटाणे विक्रीचा व्यवसाय आहे. दरम्यान काल सायंकाळी त्या व्यवसाय आटपून घरी जात असतांना जलालपुरा टि पॉईट जवळ अनोळखी २० वर्षीय युवकाने सदर महिलेच्या दिशेने धाव घेत तिच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची गहू पोथ बळजबरीने हिसकावून पोबारा केला. याबाबत सौ. किरकाळे यांनी खामगाव शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी अनोळखी आरोपी विरुध्द कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास ठाणेदार सुनील अंबुलकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीता आहेत. सदर चोरटा हा त्या ठिकाणी असलेल्या सीसीटिव्हीत आल्याचे पोलिसांचाअंदाज आहे. त्यामुळे या ठिकाणच्या सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here