घरकुलासाठी हजार रुपयाची लाच घेतांना अभियंता जाळ्यात

0
421
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोट: येथील पंचायत समिती कार्यालयातील ग्रामिण गृहनिर्माण अभियंत्यास 1 हजार रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई अकोला लाचलुचपत विभागाने 7 डिसेंबररोजी संध्याकाळी 5 वाजता केली. रमाई घरकुल योजनेचे दोन घरकुलांचे 45 हजार रुपयांचे अनुदान काढुन देण्यासाठी त्याने लाच मागितली.
ग्रामिण गृहनिर्माण अभियंता मंगेश सुधाकर वानखडे याने धनादेश काढून देण्यासाठी 1 हजार रुपयाची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली होती. त्याअनुषंगाने सोमवारी सापळा रचण्यात आला. तक्रारकर्त्याकडून लाच घेतांना मंगेश वानखडे यास रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु  होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here