व-हाडात चक्का जाम! आमदारांनी रोखला हायवे, स्वाभिमानीने अडवली रेल्वे

0
266

3 दिवसात नवा कृषी कायदा रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकाेलाः नव्या कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली आहे. मलकापूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात रेल्वे रोखण्यात आली. तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नांदुरा येथे आ. राजेश एकडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 रोखण्यात आला आहे.
अकोला, बुलडाणा, वाशिम या तीनही जिल्ह्यात सर्वत्र चक्का जाम झाला आहे. तर विक्रेत्यांनीही आपली दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवल्याचे दिसते. शेतकरीही मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.सकाळी 8 वाजेपासूनच भारत बंदला जोरदार सुरुवात झाली आहे. ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांसह चेन्नई – अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस मलकापूर रेल्वे स्थानकावर रोखली आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने तात्काळ तोडगा काढावा यासाठी बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आज सकाळ पासून रस्त्यावर उतरली आहे.

मलकापूरात स्वाभिमानीने अडवली रेल्वे 
मलकापूर : शेतकऱ्यांच्या भारत बंदला सर्वत्र  प्रतिसाद मिळत असून  बुलडाणा जिल्‍ह्यात   ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांसह मलकापूर रेल्‍वेस्‍थानकावर चेन्नई –  अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस काही काळ रोखली होती. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने तात्काळ तोडगा काढावा यासाठी बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आज सकाळ पासून रस्त्यावर उतरली आहे. सकाळी ६ वाजता स्‍वाभिमानीच्‍या कार्यकर्‍त्यांनी येथे आंदोलन केले.
यावेळी रविकांत तुपकरसह कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बोलचाल झाली. त्यामुळे ‘स्वाभिमानी’ आणि पोलिसांमध्ये चांगलाच संघर्ष निर्माण झाल्याचे बघायला  मिळाला. तर पोलिसानी २० ते ३०  कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात घेतलं असून येत्या ३ दिवसांत कायदा रद्द न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा   स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्‍या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

नांदुरा येथे आ.राजेश एकडे यांनी अडवला हायवे
मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वात नांदुरा येथे कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे विरोधात केलेल्या कायद्याला आता महाविकास आघाडी चा जाहीर पाठिंबा दिला आहे.
त्या आंदोलनाला महाविकास आघाडी चा पाठिंबा असून मंगळवारी आमदार राजेशभाऊ एकडे यांनी व्यापा-यांना प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला आहे. या आंदोलनात वसंतराव भोजने (शिवसेना), मोहनराव पाटील (राष्ट्रवादी नेते), युवराज देशमुख ता. प्र. राष्ट्रवादी नांदुरा, भगवान भाऊ धांडे ता.अध्यक्ष काँग्रेस नांदुरा, विजय साठे ता. प्र. सेना मलकापूर, किशोरभाऊ नवले श. प्र. सेना मलकापूर, लालाभाऊ ईगळे सेना श. प्र. नांदुरा
नितीन मानकर श. प्र. राष्ट्रवादी, गौरव पाटील श. प्र. काँग्रेस, माधवराव गायकवाड ता.प्र. राष्ट्रवादी मलकापूर, राजूभाऊ पाटील श. अध्यक्ष काँ. मलकापूर, बंडूभाऊ चौधरी, ता. अध्यक्ष काँग्रेस मलकापूर, शाहीद शेख श.अध्यक्ष राष्ट्र. मलकापूर आदी सहभागी झाले होते.
मलकापूर तालुक्यात ठिकठिकाणी रास्तारोको 
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, प्रहार जनशक्ती पक्ष, शेकाप, आझाद हिंद संघटना, माकप, शेतकरी स्वाभिमानी संघटना व इतर सर्व पक्षांच्या, संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने भारत बंद पुकारण्यात आला होता. त्यावेळी मलकापूर शहर व तालुका पूर्ण कडकडीत बंद ठेवण्यात आले. त्यानंतर दाताळा, जांभूळ धाबा, धरणगाव, व बेलाड फाट्यावर चक्का जॅम करण्यात आला. त्यावेळी वरील सर्व पक्षाचे शेतकरी, कार्यकर्ते, पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

अकोल्यात काँग्रेसची रॅली

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हा काँग्रेसकडून स्वराज्य भवनपासून रॅली काढण्यात आली. मनपा विरोधी पक्षनेता साजीदखान पठान, रमाकांत खेतान, अविनाश देशमुख,प्रकाश तायडे,प्रदीप वखारिया, नितीन ताकवाले, तश्वर पटेल, कपिल रावदेव, संजय मेश्रामकर, नगरसेवक मो. इरफान, पराग कांबळे, मो. जमीर, विजय शर्मा, आकाश कवडे, आकाश शिरसाट, राजेश राऊत, राकेश पाटील, मो. इस्माईल, गणेश कळसकर, राजू इटोले, प्रकाश सोनोने, महिला आघाडीच्या पुष्पा देशमुख आदी रॅलीत सहभागी होत्या.

अकोला बसस्थानकावर प्रवाशांची तारांबळ
भारत बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकावर वाहनचालकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आधीच बसेस उभ्या करून दिल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळी 7 वाजेपासूनच बसेस उभ्या केल्याने बाहेर गावला जाणा-या नागरिकांची धांदल उडाल्याचे दिसून आले. यामुळे अनेकांना दुचाकीने प्रवास करावा लागला.

मुर्तिजापूर बंदला प्रतिसाद

मुर्तिजापूर: सरकारने शेतक-यांच्या मागणीची दखल घ्यावी यासाठी 32 संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले होते. त्या बंदला मूर्तीजापुर येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रगती शेतकरी मंडळ मूर्तीजापुर तालुका, जनमंच नागपूर, शेतकरी कामगार पक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, न्यु.यंग क्लब फार्मर्स ग्रुप,भारतीय किसान संघ मूर्तीजापुर यांच्या वतिने 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 3  वाजेपर्यंत शहर बंदचे आवाहन करण्यात आले. शहर वासीयांनी संमीश्र प्रतिसाद दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी तहसीलवर मोर्चा काढला. मोर्चात शहर काँग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष दिनेश दुबे, पंचायत समिती सभापती तथा जेष्ठ काँग्रेस नेते बबनराव डाबेराव,अकबर हुसैन, रोहित सोळंके, वानखडे, किशोर सोनोने,विनोद बंग,जयप्रकाश रावत, राष्ट्रवादीचे शिवकुमार कांबे, सागर कोरडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संजय नाईक आदी सहभागी झाले होते.

चिखलीत काँग्रेसचा चक्का जाम
केंद्राच्या शेतकरी  विरोधी  कायदयाच्या विरोधात देशभरातील शेतक-यांनी
पुकारलेल्या भारत बंद ला समर्थन व पाठींबा म्हणुन चिखलीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चिखली शहरात  कडकडीत बंद पाळण्यात आला. या दरम्यान कडकडीत बंद व चक्का जाम आंदोलन यामुळे सुनसान पडलेल्या  रस्त्यावर बसुन पिठले भाकरीचा आस्वादही काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळया समोर सदर आंदोलनास सुरूवात झाली. त्यानंतर संपुर्ण शहरात बंदचे आवाहन करीत मोटर सायकल रॅली काढण्यात आली होती.

मेहकरात कडकडीत बंद, सर्व पक्ष मैदानात
शेतकरी विरोधी कायदा रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आज शिवसेनेसह सर्व
पक्ष मैदानात उतरले. तर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणास विरोध म्हणून बंदचे आवाहन करण्यात आले होते. मेहकरात आज शिवसेना खासदार प्रतापराव जाधव व शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचे नेतृत्वाखाली
शिवसेनेने बंदचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद मिळाला. यावेळी शहरातील
जिजाऊ चौकात घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी आमदार संजय रायमुलकर, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर,तालुका प्रमुख सुरेश वाळूकर,उपनगराध्यक्ष जयचंद बाठीया, कृउबास उपसभापती बबनराव तुपे  संकेत चिंचोळकर  वेभव सावजी  न.प.सभापती ओम सौभागे,तौफिक कुरेशी  मनोज घोडे  समाधान सास्टे, रामेश्वर भिसे, विकास जोशी, रवी रहाटे,  मनोज जाधव, संतोष चनखोरे, भास्कर राऊत, पी आर देशमुख, भूषण घोडे, नीरज रायमुलकर, कलीमभाई, नागेश सोनुने आदी सहभागी झाले होते.

Advertisements
Previous articleमहामार्गाच्या कामासाठी खोदलेल्या खड्डयात पडल्याने इसम गंभीर जखमी
Next articleजी. श्रीकांत महाबीजचे नवे व्यवस्थापकीय संचालक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here