स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला; अंगरक्षक जखमी

0
458

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

बुलडाणा: जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर एका माथेफिनेटवर्करूने हल्ला केल्याची घटना 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता घडली. वेळीच कुऱ्हाडीचा वार अंगरक्षकाने झेलल्याने तुपकरांचा जीव वाचला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत चिखली रोडवरील कार्यालयात बसले होते. एवढ्यात एक व्यक्ती त्यांच्या वाहनासमोर उभा राहून गाडीचा नंबर नोट करीत होता. रविकांत तुपकर यांचा पीए सौरभ पडघन याने त्यास हटकले. एवढ्यात रविकांत तुपकर काय झाले हे पाहण्यासाठी बाहेर आले तेव्हा जनार्दन दगडू गाडेकर याने रविकांत तुपकर यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला चढवला. हा वार तुपकर यांचे अंगरक्षक गणेश चाटे याने रोखला. दुसरा वार गाडेकर याने केला असता सौरभ पडघनने वार रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या छातीत कुऱ्हाड लागल्याने तो जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी जनार्दन गाडेकर यास ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे.

Advertisements
Previous articleशाळा बंद मात्र गणवेशाचे पैसे खात्यात, 4662 विद्यार्थ्यांना होणार लाभ
Next articleजागर फाऊंडेशनची ‘माझी परसबाग स्पर्धा’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here