जिल्ह्यातील 436 महिला सरपंचपदांचे आरक्षण निश्चित

0
185

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

बुलडाणा: जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले असून  जिल्ह्यातील एकूण 870 ग्रामपंचायतीच्या सरपंच
पदापैकी 436 ग्रामपंचायती मधील महिला सरपंचपदासाठी  आरक्षण 10 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले.आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाली. निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, तहसीलदार रूपेश खंडारे उपस्थित होते.
तालुकानिहाय महिलांचे आरक्षण संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांनी चिठ्ठीद्वारे काढले.

बुलडाणा – ग्रामपंचायत 66, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 12 पैकी 6 महिला,अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं 3 पैकी एक महिला,नागरिकांचा मागास प्रवर्ग 18 ग्रा. पं. पैकी 9 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण 33 पैकी 17 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रापं 33. चिखली- ग्रामपंचायती 99, अनु. जाती प्रवर्ग एकूण 21  पैकी 11 महिला,अनु. जमाती 3 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग 27 ग्रा. पं. पैकी 13 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग 48 पैकी 24 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 49. मेहकर : ग्रामपंचायती 98, अनु.जाती प्रवर्ग 21 पैकी 10 महिला,अनु.जमाती ग्रा.पं.6 पैकी 3 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग 26 पैकी 13 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग 45 पैकी 23 ग्रा.पं. महिला राखीव,महिला राखीव ग्रा.पं 49. लोणार : ग्रामपंचायती 60,अनु.जाती प्रवर्ग 11 पैकी 6 महिला,अनु. जमाती 2 पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग 16 पैकी 8 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग 31 पैकी 16 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 31. सिंदखेड राजा : ग्रामपंचायती 80,अनु.जाती प्रवर्ग 18 पैकी 9 महिला,अनु.जमाती ग्रा.पं 1 पैकी एक महिला,नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं 22 पैकी 11 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग 39 पैकी 20 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला
राखीव ग्रा.पं 41. दे. राजा : ग्रामपंचायती 48, अनु.जाती
प्रवर्ग 11 पैकी 5 महिला,अनु. जमाती ग्रा.पं 1 पैकी
निरंक महिला,नागरिकांचा मागास प्रवर्ग ग्रा.पं 13 पैकी 6 महिला,सर्वसाधारण प्रवर्ग 23 पैकी 11 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 22. मलकापूर : ग्रामपंचायती 49, अनु.जाती प्रवर्ग 8 पैकी 4 महिला,अनु. जमाती ग्रा.पं 4 पैकी 2
महिला,नागरिकांचा मागास प्रवर्ग ग्रा.पं 13 पैकी 7 महिला,
सर्वसाधारण प्रवर्ग 24 पैकी 12 ग्रा.पं महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं. 25. मोताळा : ग्रामपंचायती 65, अनु. जाती प्रवर्ग 11 पैकी 6 महिला,अनु.जमाती 6 पैकी 3 महिला,
नामाप्र ग्रा.पं 18 पैकी 9 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग 31 पैकी 15 ग्रा.पं महिला राखीव, महिला राखीव ग्रा.पं. 33. नांदुरा : ग्रामपंचायती 65, अनुसूचित जाती प्रवर्ग 11 पैकी 5 महिला,अनु.जमाती ग्रा.पं.4 पैकी 2 महिला, नामाप्र ग्रा.पं.18 पैकी 9 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग 32 पैकी 16 ग्रा.पं.महिला राखीव, महिला राखीव ग्रा.पं 32. खामगांव : ग्रामपंचायती 97, अनु.जाती प्रवर्ग 21 पैकी 10 महिला,अनु.जमाती ग्रा.पं 4 पैकी 2 महिला, नामाप्र ग्रा.पं.26 पैकी 13 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग 46 पैकी 23 ग्रा.पं महिला राखीव, महिला राखीव ग्रा.पं 48. शेगांव : ग्रामपंचायती 46, अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 10 पैकी 5 महिला, अनु.जमाती ग्रा.पं 1 पैकी एक महिला, नामाप्र ग्रा.पं.12 पैकी 6 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग 23 पैकी 11 ग्रा.पं. महिला राखीव, महिलांसठी राखीव ग्रा.पं 23. जळगांव जामोद : ग्रामपंचायती 47, अनु.जाती प्रवर्ग 7 पैकी 4 महिला,अनु.जमाती ग्रा.पं 8 पैकी 4 महिला, नामाप्र एकूण
ग्रा.पं 13 पैकी 7 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग 19 पैकी 10 ग्रा.पं
महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 25. संग्रामपूर :
ग्रामपंचायती 50, अनुसूचित जाती प्रवर्ग 8 पैकी 4 महिला, अनु.जमाती ग्रा.पं 8 पैकी 4 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग
ग्रा.पं 13 पैकी 7 महिला, सर्वसाधारण प्रवर्ग 21 पैकी 10 ग्रा.पं
महिला राखीव, एकूण महिला राखीव ग्रा.पं 25. अशाप्रकारे  जिल्ह्यात 870 ग्रामपंचायती असून अनुसूचित जाती प्रवगार्साठी 170 ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित आहे. त्यापैकी 85 महिला, अनुसूचित जमातीसाठी एकूण 50 ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण आहे. यापैकी 25 ग्रामपंचायती महिला राखीव
आहेत. नागरिकांचा मागास प्रवगार्साठी एकूण 235 ग्रा.पं सरपंच पद आरक्षण असून त्यापैकी 118 महिलांसाठी राखीव आहे. तसेच सर्वसाधारण प्रवगार्साठी 415 ग्रामपंचायतींपैकी 208 ग्रा.पं सरपंचपदावर महिला आरूढ होणार आहेत.

Advertisements
Previous articleबीपीएलचा दाखला ग्रा.प. स्तरावर मिळणार
Next articleआता सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारीही दिसतील एकाच गणवेशात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here