आता सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारीही दिसतील एकाच गणवेशात

0
285

वर्‍हाड दूत न्यूज  नेटवर्क 

मुंबईः शाळेतल्या मुलांप्रमाणं सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारीही एकाच गणवेशात दिसले तर..? ही गोष्ट नाहीये, तर हा आदेश निघालाय. महाराष्ट्र सरकारनं सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू केला आहे आणि त्यामुळेच आता सरकारी कार्यालयातून जिन्स आणि टी-शर्ट हद्दपार झाले आहे. कामावर असताना कुठले आणि कसे कपडे घालावे याचं एक परिपत्रक महाराष्ट्र सरकारनं काढलंय. ज्यामध्ये ड्रेस कसा असावा, कुणी कुठले कपडे घालावे याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. (Government Order Issued; Officers And Staff In The Same Uniform)
सार्वजनिक आयुष्यात वावरत असताना सरकारी कर्मचाऱ्यांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलावा ही भावना सरकारची आहे. कपड्यांवरुन सरकारी कर्मचारी ओळखला जावा आणि प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला जबाबदार व्यक्ती समजलं जावं, यासाठी हा बदल केला गेलाय. आता सरकारनं कर्मचाऱ्यांचे कपडे बदलले असले, तरी त्यांची काम करण्याची पद्धत मात्र तीच राहणार आहे. ज्या पद्धतीचा त्रास नागरिकांना सर्वाधिक होतो, ती पद्धत बदलण्यासाठी सरकारनं काही तरी ठोस उपाय करणं गरजेचं आहे, तरंच कपड्यांसोबत बदललेला सरकारी कर्मचारीही व्यवस्था बदलाचा भाग बनेल.
काय आहेत या सूचना?
गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम असलेले कपडे परिधान करु नये
अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स टी-शर्टचा वापर कार्यालयात करु नये
कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा खादीचे कपडे घालावे
महिलांनी साडी, सलवार, कुर्ता, शर्ट आणि ट्राऊझर्स वापरावे
एवढ्यावरच सरकार थांबलेलं नाही, तर पायात काय घालावं याही सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत
स्लीपरही सरकारी कार्यालयाबाहेर!
महिला कर्मचाऱ्यांनी चप्पल, सँडल, शूज वापरावे
पुरुष कर्मचाऱ्यांनी शक्यतो शूज किंवा सँडल वापरावी
कार्यालयात स्लीपरचा वापर करु नये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here