रविकांत तुपकरांवरील हल्ल्याची सखोल चौकशी करू : ना.अनिल देशमुख

0
101

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

बुलडाणा:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष, रविकांत तुपकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची नि:पक्षपातीपणे सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला भेटीअंती दिली.
रविकांत तुपकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी आरोपील कठोरात कठोर शिक्षा करावी,  या मागणीचे निवेदन नागपूर जिल्हाध्यक्ष दयाल राऊत व बुलडाणा जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने
गृहमंत्री अनिल देशमुख यांना सादर केले. गृहमंत्र्यांसमोर घडलेल्याघटनेचा शिष्टमंडळाने निषेध नोंदविला. हा हल्ला निंदनीय आहे.हल्लेखोरासकोणी पाठविले होते का ? यामागे काही राजकीय षड्यंत्र आहे का ?याचीहीसखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. रविकांततुपकर हे १८वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवूनदेण्यासाठी झटत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक प्रस्थापितांविरोधात,सरकारविरोधात  सत्याग्रह व आंदोलने करून सर्वसामान्यांना न्यायमिळवूनदिला आहे. तसेच ऊस आंदोलन, दूध आंदोलन, सोयाबीन, कापसाचे
आंदोलन व बोगसबियाणे कंपन्यांविरोधात आंदोलनात यांची प्रमुख भूमिका राहिली आहे.त्यांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य जनतेला अनेकवेळा न्याय मिळालाआहे.त्यातूनच अनेक राजकीय विरोधक व प्रस्थापित तुपकरांविषयी आकसबाळगून आहेत.त्यातीलच काही लोक रविकांत तुपकर व त्यांचा कुटुंबियांना हानीपोहोचविण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे गृहमंत्र्यांच्यानिदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे या हल्ल्यामागे कोण आहे हेशोधणेगरजेचे आहे, अशी विनंती शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here