हम हैं कोविड योद्धा! शॉर्टफिल्ममध्ये झळकले किनखेड पूर्णा चे विद्यार्थी

0
223

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोट: श्री शिव छत्रपती साम्राज्य ग्रुपचे संस्थापक श्री संतोष दादा खवले निर्मित आणि गुरू माऊली प्रोडक्शन चे श्री दीपक दादा गोरे दिग्दर्शित हम है कोवीड योद्धा ह्या शॉर्ट फिल्म चा काल दिनांक १३ डिसेंबर ला सत्यविजय टॉकीज अकोट येथे प्रीमिअर शो संपन्न झाला. कोवीड ह्या जागतिक महामारीच्या काळात संपूर्ण जग भयग्रस्त झालं होतं. लोकांचें रोजगार बुडाले होते. अपंग,निराधार, मजूर भूकबळी ठरत होते. अशा लोकांना अन्नदान व इतर मदत करणारे समाजसेवी, लॉक डाऊन च्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण देणारे शिक्षक,घाबरलेल्या समाजाला बळ देणारे,दैद्याकिय मदत देणारे प्रशासनातील पोलीस दल,डॉक्टर,महसूल विभाग यांनी दिलेल्या सेवेचा धावता आढावा ह्या फिल्ममध्ये घेतला. ह्या शॉर्ट फिल्म मध्ये अकोटचे तत्कालीन तहसीलदार श्री राजेश गुरव साहेब,अकोट चे ठाणेदार श्री संतोष महल्ले साहेब, अकोट ग्रामीणचे ठाणेदार श्री ज्ञानोबा फड साहेब यांच्यासह जि प शाळा किनखेड पूर्णा चे विद्यार्थी अश्वजीत ओइंबे , शिवा कांबे,ज्ञानेश्वरी मोंढे , वंशीका दंदी,मयुरी इंगळे,पूनम इंगळे यांनी बालकलाकार म्हणून तर श्री संतोष झामरे, श्री विष्णु झामरे ह्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत सहकलाकार म्हणून भूमिका साकारली. प्रीमियर शो करिता टॉकीज चे मालक श्री विजयजी झुनझुनवाला यांच्यासह अकोट मधील बहुसंख्य शिक्षक, पत्रकार,समाजसेवी व श्री शिव छत्रपती साम्राज्य ग्रुपच्या माध्यमातून सतत नवनवीन सामाजिक उपक्रम राबविणारे ग्रुपचे अध्यक्ष श्री संतोष दादा खवले यांनी जोडलेला सर्वच स्तरातील मित्र परिवार उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here