अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप!

0
334

आदर्श पोषणबाग फुलवणाऱ्या सेविका, मदतनिसांचा गौरव

सोहम घाडगे
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: बुलडाणा : आदर्श पोषणबाग फुलवणाऱ्या १६ अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या पाठीवर बुलडाणा एकात्मिक बालविकास विभागाच्या वतीने कौतुकाची थाप देण्यात आली. साडीचोळी, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात शुक्रवारी हा कार्यक्रम झाला.
एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प बुलडाणा अंतर्गत पोषण अभियान राबविण्यात आले. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यात निकोप स्पर्धात्मक वातावरण तयार व्हावे या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले. उत्कृष्ट पोषण बाग तयार करणाऱ्या १६ अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा साडीचोळी, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. महिला व बालकल्याण सभापती ज्योती पडघान, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अरविंद रामरामे, प. स. सभापती उषा चाटे, जि. प. सदस्य जयश्रीताई शेळके, साधना जाधव, हिना सौदागर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या चार लाभार्थ्यांना मुदतठेव योजना प्रमाणपत्र देण्यात आले. बालविकास प्रकल्प अधिकारी गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी बुलडाणा प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षिका व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. संचालन स्मिता भोलाने यांनी केले.
यांचा झाला सन्मान
बोरखेड येथील अंगणवाडी सेविका, मदतनिस सिंधू खांडवे, शकुंतला काकडे, सव येथील अंगणवाडी क्र. २ च्या अलका लव्हाळे, नितु पवार, सातगावच्या अंगणवाडी क्र. ३ मधील गंगू गिरी, प्रभा जाधव, सागवन येथील अंगणवाडी क्र.४ च्या मंदा शेळके, कांता निंभोरे, शिरपूर येथील अंगणवाडी क्र.६ च्या रंजना रिंढे, किरण गवई, खुपगाव येथील अंगणवाडी क्र. १ व २ च्या तारामती जाधव, रेखा डुकरे, उर्मिला नागरे, सागवन येथील अंगणवाडी क्र. ५ व ७ च्या प्रमिला एडके, दुर्गा इंगळे, अनिता टाकळकर अशा १६ जणींचा उत्कृष्ट कामासाठी सत्कार करण्यात आला. पोषण बागेत फुलवलेली पालेभाजी, फळभाजी लाभार्थ्यांना देऊन कुपोषण दूर करण्यास एक प्रकारे हातभार लागण्यास मदत झाली आहे.

Advertisements
Previous articleहम हैं कोविड योद्धा! शॉर्टफिल्ममध्ये झळकले किनखेड पूर्णा चे विद्यार्थी
Next articleकृषी कायद्यात शेतक-यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य : संजय धोत्रे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here